साहित्य:
१ कप शिजवून किसलेला बटाटा (साधारण २ मध्यम)
१ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ ते १/२ कप किसलेले पनीर
२ टेस्पून बारीक चिरलेला कांदा
१० ते १२ मनुके/बेदाणे
१ टेस्पून काजूचे तुकडे
१ हिरवी मिरची
१ टिस्पून बटर
तळण्यासाठी तेल
मिठ
कोफ्ता करीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा
कृती:
१) एका लहान कढई मध्यम आचेवर तापवून १ टिस्पून बटर घालावे.त्यात २ टेस्पून चिरलेला कांदा घालून तो ब्राऊन होईस्तोवर परतावा. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काजूचे तुकडे, मनुके घालून १ मिनीट परतावे. शेवटी पनीर आणि मिठ घालून थोडावेळ परतावे आणि हे मिश्रण एका छोट्या वाडग्यात काढावे. थोडे कोमट होवू द्यावे.
२) शिजवून किसलेले बटाटे, १ टेस्पून कॉर्न फ्लोअर आणि थोडे मिठ एकत्र करून निट मळून झाकून ठेवावे.
३) बटाट्याच्या मिश्रणाचे साधारण १० गोळे करावे (१ इंच). प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून या मिश्रणाची पुरी लाटावी किंवा हातानेच मोदकासाठी करतो तशी पारी करावी. त्यात आवश्यक तेवढे पनीरचे मिश्रण मध्यभागी ठेवून पुरी सर्व बाजूनी बंद करावी. आणि हे कोफ्ते मध्यम आचेवर गोल्डन रंगावर तळून काढावे.
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .