साहित्य / सामग्री :
- साखर - 4 चमचे
- बदाम - 2 चमचे
- लोणी ( butter ) - अर्धा चमचा
- दूध - अर्धा ग्लास
- सफरचंद - 2 ते 3
- Vanilla ice cream (व्हॅनिला आईस क्रीम )- 1 चमचा
कृती :
एका कढईत 4 चमचे साखर गरम करून वितळवून पाक तयार करा.
त्यात 2 चमचे बदाम टाकून ढवळून घ्या व मग त्यात अर्धा चमचा लोणी ( butter) टाका नंतर गॅस मंद आचेवर ठेवून मिश्रण ढवळून घ्या व गॅस बंद करून त्यात 4 ते 5 चमचे दूध टाका.
मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात अर्धा ग्लास दूध घाला व 2 ते 3 चमचे सफरचंद , 1 चमचा Vanilla ice cream (व्हॅनिला आईस क्रीम ) घालून मिश्रण बारीक लावून घ्या.
व ग्लासमधे ओतून घ्या
मग सफरचंद मिल्क शेक पिण्यासाठी तयार.
टीप :
मिल्क शेकच्या सजावटीसाठी ड्रायफृट वापरावेत.
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .