मेदू वडा ( Medu vada ) recipe in marathi

 

मेदू वडा ( Medu vada ) recipe in marathi

मेदू वडाबद्दल माहीती :

मेदू वडा हा उडीदापासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. याला उडीद वडा असेही म्हटले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे. दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो.


साहित्य :

  1. बिनासालिचे उडीद -   १ कप 
  2. जिरे -   १ चमचा
  3. मिरपूड -   १ चमचा 
  4. हिरवी कोथिंबीर -   १ चमचा 
  5. नारळाचे खोबरे -   २ चमचा
  6. मीठ -   आवश्यकतेनुसार 
  7. तेल -   तळण्यासाठी


कृती :

 एका भांड्यात उडीद व पाणी घ्यावेत आणि उडीद पाण्यात 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर ते स्वच्छ पाण्यात 4 ते 5 तास भिजत घालून ठेवाव्यात. 

उडीद चांगले भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून उडीद बारीक वाटून घ्यावेत. उडीद वाटत असताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिश्रण फुलून आकारात दुप्पट होईल.

त्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर , 2 -3 चमचे ओल खोबरे , 1 चमचाभर मिरपूड , 1 चमचा जिरे , आवश्यकतेनुसार मिठ टाकून मिश्रण एकत्र करा.

एका कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवा.

हात पाण्याने थोडे ओले करून तयार केलेल्या मिश्रणाचे गोळे करून त्यात बोटाने  छिद्र करावे व ते उकळत्या तेलात सोडून त्याला लालसर होईपर्यंत तळून झाल्यावर ताटात काढून घ्यावेत. 

मग मेदू वडे खाण्यासाठी तयार .


टीप : 

1. मेदू वडा उडीद डाळी ऐवजी बिनासालिच्या उडीदापासून बनवल्यास वडा उत्तम व चविष्ट बनतो.

2. कढईत खूप जास्त वडे असतील तर शेवटचा वडा जास्त तेलकट होईल. म्हणून कढईत आवश्यकतेनुसारच वडे तळण्यासाठी सोडा.




Post a Comment

0 Comments