साहित्य :
1 वाटी मैदा2 चमचे खाण्याचा सोडा
5 ते 6 चमचे तूप
4 ते 5 चमचे दही
ड्रायफृट ( काजू , बदाम, पिस्ता, मनूका )
1 वाटी मावा
2 ते 3 इलायची
अर्धा वाटी खोबऱ्याचे किस
5 ते 6 चमचे पिठीसाखर
तेल आवश्यकतेनुसार
पाणी गरजेनुसार
कृती :
एका वाडग्यात 1 वाटी मैदा त्यात 2 चमचे खाण्याचा सोडा , 3 ते 4 चमचे तूप , 4 ते 5 चमचे दही व गरजेनुसार पाणी घालून मिश्रण एकत्रित मळून घ्यावेत. व ते मिश्रण 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यावेत.
कढई मध्यम आचेवर ठेवून त्यात 1 चमचा तूप गरम करून घ्यावेत व त्यात ड्रायफृट ( काजू , बदाम, पिस्ता, मनूका ) घालून ढवळून घ्यावेत. व त्यात 1 वाटी मावा , 2 ते 3 इलायची, अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे किस , 5 ते 6 चमचे पिठीसाखर घालून मिश्रण ढवळून घ्यावेत.
मग तयार केलेल्या मैदयाच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करून त्याची पोळी लाटून घ्यावीत. पोळी करंजीच्या साच्यात घालून त्यात सारण भरून घेऊन करंजी तयार करून घ्यावीत. करंजीचे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. करंजीच्या कडांना पाणी लावल्यावर सारण बाहेर येणार नाही.
त्यानंतर एक कढई मध्यम आचेवर ठेवून त्यात तेल गरम करून घ्यावेत व त्यात तयार केलेल्या करंज्या सोडून लालसर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावेत.
मग करंजी खाण्यासाठी तयार...
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .