बुंदीचे लाडू ( bundi ladu ) recipe in marathi

बुंदीचे लाडू ( bundi ladu ) recipe in marathi

 साहित्य:

2 वाटी -  बेसन
2 वाटी -  साखर
अर्धा वाटी - दूध 
अर्धे  -  लिंबू 
तेल व तूप - तळण्यासाठी 
अर्धा वाटी -  टरबूजाच्या बिया 
खाण्याचा लाल रंग 
काजू -  सजावटीसाठी

कृती:

एका वाडग्यात 2 वाटी -  बेसन व घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून ढवळून घ्यावेत व त्यात एक लहान चमचाभर खाण्याचा लाल रंग घालून मिश्रण एकजीव करून घ्यावेत. 
एक कढई मध्यम आचेवर ठेवून त्यात तेल गरम करून तूप घालावेत.  तेल , तूप गरम झाल्यावर त्यात झाऱ्याच्या साहाय्याने बेसनचे मिश्रण टाकून घ्यावेत.  झाऱ्याचा वापर केल्याने बुंदी उत्तर प्रकारे बनते . तसेच बुंदी तयार करताना झाऱ्याला झटके द्यावे त्याने बुंदी चांगली बनते . हे बेसनचे मिश्रण अर्धा मिनिट ( 30 सेकंद ) मध्यम आचेवर तळून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यावेत . 
कढई मध्यम आचेवर ठेवून त्यात 2 वाटी -  साखर घेऊन त्यात एक वाटी पाणी घालून घ्यावेत. व अर्धा वाटी - दूध घालावेत . साखर वितळल्यानंतर त्यात खाण्याचा लाल रंग व अर्ध्या लिंबाचा रस घालुन घ्यावा . मिश्रण ढवळून घ्यावेत. व त्यात बेसनची तयार केलेली बुंंदी व अर्धा वाटी -  टरबूजाच्या बिया घालून मंद आचेवर 2 मिनिटासाठी शिजवून घ्यावेत. त्यानंतर कढई 1 ते 2 तास थंड होण्यास ठेवून द्यावी . 
बुंदीचे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू वळावेत.  त्यासाठी हातात राहील तेवढी बुंदी घेऊन त्याला गोल आकार देवून लाडू वळावेत व त्यावर काजू घालून सजावट करून घ्यावी .

बुंदीचे लाडू खाण्यासाठी तयार...

Post a Comment

0 Comments