साहित्य :
लिंबू - 10 ते 12
साखर - 1 वाटी
सब्जाच्या बिया - 1 चमचा
कलिंगड
काळे मीठ - 1 चमचा
बर्फ - 4 ते 5 तुकडे
कृती :
सर्व लिंब कापून घ्या व एका भांड्यात त्यांचा सर काढून घ्या . एका कढईत एक वाटी पाणी गरम करायला ठेवा . पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी साखर टाकुन घ्या . व थोडे-थोडे ढवळून साखर वितळवून घ्या . साखर वितळल्यानंतर ज्योत बंद करून मिश्रण थंड होऊ द्या . मग त्यात लिंबांचा रस घालून मिश्रण ढवळून घ्या . हे मिश्रण फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस चांगले राहील .
एक चमचाभर सब्जाच्या बिया 15 ते 20 मिनिटे पाण्यात शिजत ठेवा . मिक्सरच्या भांड्यात कलिंगडाचे 8 ते 10 लहान - लहान कापलेले तुकडे घालून ते बारीक करून घ्या .
एका ग्लासमध्ये एक मोठा चमचाभर तयार केलेले लिंबू व साखरेचे मिश्रण घालून त्यात एक चमचा भिजवलेल्या सब्जाच्या बिया घाला . एक चमचाभर काळे मीठ व बर्फ घालून ढवळून घ्या . मग त्यात बारीक केलेले कलिंगड चाळणीच्या साहाय्याने घालून घ्यावे . चाळणीमुळे कलिंगडाचा फक्त रस सरबतामध्ये घालता येईल .
कलिंगड व लिंबाचा सरबत पिण्यासाठी तयार....
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .