मुगडाळ भज्जी (mung dal bhaji) recipe in marathi


साहित्य :
1 वाटी मुगडाळ
2 ते 3 चमचे धणेपूड 
1 ते 2 चमचे हिरवी मिरची पेस्ट 
1 चमचा जिरेपूड 
1 चमचा आले लसूण पेस्ट 
1 चमचा लाल तिखट 
1 चमचा हळद 
मीठ चवीनुसार 
अर्धा वटी कोथिंबीर 
तेल गरजेनुसार 

कृती :
एका वाडग्यात 1 वाटी मुगडाळ व 1 वाटी पाणी घालून साधारण 3 तास भिजत ठेवून द्यावेत . त्यानंतर मुगडाळीमधील पाणी काढून घ्यावेत व मुगडाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावीत मग त्यात 1 ते 2 चमचे हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून मिश्रण बारीक वाटून घ्यावेत. मिश्रण एका वाटी काढून घ्यावेत व त्यात चवीनुसार मीठ ,1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट , 1 चमचा जिरेपूड, 2 ते 3 चमचे धणेपूड व अर्धा वटी कोथिंबीर घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावेत.

कढई मध्यम आचेवर ठेवून त्यात तेल गरम करून घ्यावेत व त्यात तयार केलेल्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून हळूवार सोडावेत. व भज्जी लालसर सोनेरी होईपर्यंत तळून झाल्यावर ताटात काढून घ्यावी.
मग भज्जी खाण्यासाठी तयार...


Post a Comment

0 Comments