चविष्ट करंज्या ( tasty karajya ) recipe in marathi

चविष्ट करंज्या ( tasty karajya ) recipe in marathi


साहित्य :

1 वाटी रवा

1 वाटी मैदा

2 ते 3 चमचे तूप

1 वाटी गुळ

1 चमचा खसखस

1 चमचा वेलचीपूड

1 वाटी किसलेले खोबरे 

1 चमचा हळद

आवश्यकतेनुसार मीठ

कृती :

एका पॅनमध्ये एक वाटी किसलेले खोबरे घ्या. त्यामध्ये 1 वाटी गूळ घालून एकत्र करा. यानंतर एक चमचा खसखस आणि वेलचीपूड  घालावी. मध्यम आचेवर सर्व सामग्री नीट परतून घ्या व सारण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.

दुसऱ्या भांड्यात एक वाटी मैदा आणि 1 वाटी रवा एकत्र करून घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घाला. यानंतर 1 चमचा हळद आणि एक ते दोन चमचे तूप घालून सर्व सामग्री एकत्रीत करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून करंज्यांसाठीचे पीठ चांगल्या पद्धतीने मळा. व 10 ते 15 मिनीटासाठी झाकून ठेवावे .

त्यानंतर थोडंसं तूप घालून पीठ पुन्हा मळा. पिठाचे लहान गोळे तयार करा. हे गोळे पुरीसारखे लाटून घ्यावेत. लाटलेल्या पुरीमध्ये तयार केलेलं सारण भरा. व दोन्ही टोके एकत्र करून घ्या . सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी . व त्यास करंजीसारखा आकार द्यावा .

कढईत तेल गरम करा. हवे असल्यास करंज्या तुपात देखील तळून घेऊ शकता. करंज्या तेलात दोन्ही बाजूनं लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत. या कारंज्या गरमागरम तसेच थंड झाल्यावरही स्वादिष्ट लागतात. 

Post a Comment

0 Comments