Samosa ( समोसा ) recipe in marathi / Food Recipes in Marathi

Samosa समोसा recipe in marathi


सामग्री : 

आवरणासाठी मैदा – 100 ग्रॅम 

जीर – अर्धा चमचा

तेल –  1 चमचा 

मीठ –   चवीनुसार 

कांदा –  1 (बारीक चिरलेला) 

हिरव्या मिरच्या –  2 - 3 (बारीक चिरलेल्या)

आल्याची पेस्ट –   1 चमचा

कोथिंबीर –   गरजेनुसार

बटाटे –   4 - 5 (उकडलेले) 

हळद पावडर – अर्धा चमचा 

धणेपूड – 1 चमचा 

जिरे पावडर – 1 चमचा 

तेल – आवश्यकतेनुसार

कृती :

सर्वप्रथम मैदा, मीठ व थोडे तेल घेवून एका भांड्यात चांगले मिसळून थोड पाणी घाला व त्याची कडक कणिक बनवा त्यात थोडा बेकिंग सोडा घाला व त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. मिश्रण बनविण्याची विधी: बटाट्याची साल काढून त्याला चांगले बारीक करून घ्या. कढईत तेल घेवून त्यात कांदा, जीर, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरच्या चांगल्या एकत्र होऊ द्या व त्यात कुस्करलेले बटाटे घाला. 2 - 3 मिनिटे होवू द्या. त्यात हळद, जिरे पावडर, मीठ घालून शिजू द्या. नंतर 5 मिनिटांनी मिश्रण काढून घ्या. थंड होऊ द्या. मैद्याच्या पिठाची पुरी लाटून त्यात बटाट्याचे मिश्रण भरावे व समोस्याचा आकार देवून तयार करावे. कढईत तेल घेवून त्यात हळूहळू समोसे टाका. तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा व गरमागरम खायला द्या.

Post a Comment

0 Comments