2 ते 3 वाटी - साबुदाणा ( रात्रभर पाण्यात शिजवलेला )
1 वाटी - उकडलेले शेंगदाणे
2 - मध्यम बटाटे उकडलेले
2 चमचे - शेंगदाण्याचा कूट
3 ते 4 - हिरव्या मिरच्या
चवीनुसार - मीठ
2 चमचे - जिरे
तेल - आवश्यकतेनुसार
सजावटीसाठी - कोथिंबीर व लिंबु
कृती :
एक कढई मध्यम आचेवर ठेवून त्यात 2 चमचे तेल घालून घ्यावेत व तेल गरम झाल्यावर त्यात 2 चमचे - जिरे , 3 ते 4 - हिरव्या मिरच्या , 2 - मध्यम बटाटे उकडून कापलेले , 1 वाटी - उकडलेले शेंगदाणे , चवीनुसार - मीठ घालून मिश्रण ढवळून घ्यावेत व लालसर होईपर्यंत परतून घ्यावेत.
एका वाडग्यात साबुदाणे घेऊन त्यात 2 चमचे - शेंगदाण्याचा कूट व चवीनुसार - मीठ घालून मिश्रण ढवळून घ्यावेत व हे साबुदाणे कढईत घालून बटाटे व शेंगदाणे ढवळून घ्यावेत . कढईवर झाकण ठेवून साधारण 5 मिनिटासाठी मध्यम आचेवर शिजवून घ्यावेत .
सजावटीसाठी कोथिंबीर व लिंबू कापून ताटात काढून घ्यावेत. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार...
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .