साहित्य :
300 ग्रॅम हरभरा डाळ
300 ग्रॅम गूळ किंवा साखर
एक छोटा चमचा वेलची पूड
जायफळ आणि सुंठ
150 ग्रॅम गहू पीठ किंवा मैदा
आवश्यकतेनुसार पाणी
कृती :
प्रथम हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते. ती 15 मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले आधण (उकळलेले पाणी ) काढून घ्यावे. काढून घेतलेले आधण कटाच्या आमटीसाठी वापरतात.
शिजलेल्या डाळीत त्यात गूळ घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी. म्हणजे पुरण तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ पूड घालावी.
तयार झालेले पुरण पुरणयंत्रातून गाळून घ्यावे म्हणजे ते एकजीव होते.
गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून त्याची कणिक तयार करावी. पुरण पोळीला पिवळा रंग येण्यासाठी पुरणामध्ये हळद वापरावी.
नंतर पुरणाचे सारण कणकेचा गोळा करून त्याच्यात भरावे आणि छान पुरणपोळी लाटून घ्यावी. तव्यावर मध्यम आचेवर तेल लावून पोळी भाजून घ्यावी.
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .