साहित्य :
पाणी - आवश्यकतेनुसार
स्पायरल पास्ता - 1 वाटी
तेल - 2 चमचे
मीठ - चवीनुसार
लोणी - 2 चमचे
मैदा - 2 चमचे
दुध - अर्धा ग्लास
मिरपूड - 2 चमचे
चीज - अर्धा वाटी
तेल ( ऑलिव्ह ऑईल )
लसूण - 1 चमचा
हिरवी मिरची - 1 चमचा
मका - 1 वाटी
शिमला मिर्ची ( सर्व रंगाची ) - प्रत्येकी 1 वाटी
कांदा - 1 वाटी
तुळस
कृती :
दोन कप पाणी उकळवून घेऊन त्यात एक चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घाला. मग त्यात पास्ता घालुन उकळावे, मग ते गाळून घ्या आणि बाजूला ठेवा. सॉसपॅनमध्ये लोणी आणि मैदा घालून ते एका साॅससारखे बनवा आणि एक क्षणभर शिजवा. गठ्ठ्या टाळण्यासाठी एकाचवेळी थोड्या प्रमाणात दूध घाला आणि नियमितपणे ढवळून घ्या. त्यात मीठ आणि मिरपूड टाकून घट्ट होईपर्यंत शिजवा. ज्योत(गॅस)बंद करा आणि त्यात चीज घाला. बॅकमेल सॉस तयार आहे. वॉक / पॅनमध्ये ऑलिव्ह तेल घाला. गरम झाल्यावर लसूण आणि हिरवी मिरची घाला. त्यात तुळशीची पाने परतून घ्यावी, त्यात कांदे, लाल हिरवी आणि पिवळ्या भोपळी/शिमला मिर्ची आणि कॉर्न घाला. नीट ढवळून घ्यावे . मीठ ,मिरपूड व पास्ता घाला नीट ढवळून घ्या. मग त्यात तयार केलेला मैद्याचे मिश्रण ( साॅस ) घालून ढवळा व शिजवून घ्या.
पास्ता खाण्यासाठी तयार...
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .