1 वाटी - पनीर
1 वाटी - कांदा
अर्धा वाटी - शिमला मिरची
अर्धा वाटी - टोमॅटो
4 ते 5 - हिरव्या मिरच्या
अर्धा वाटी - पुदीनाची पाने
1 वाटी - दही
1 चमचा - लाल तिखट
1 चमचा - गरम मसाला
चवीनुसार - मीठ
2 चमचे - आले लसूण पेस्ट
2 वाटी - तांदूळ ( Basmati Rice )
2 - तमालपत्र ( तेजपत्ता )
2 इंच - दालचिनीची साल
10 ते 15 - लवंग
2 - वेलची
2 ते 3 चमचे - जिरे
1 - लिंबू
3 ते 4 चमचे - तूप
आवश्यकतेनुसार - तेल
अर्धा वाटी - तळलेला कांदा
कृती :
एका वाडग्यात 1 वाटी - पनीर , अर्धा वाटी - कांदा , अर्धा वाटी - शिमला मिरची , अर्धा वाटी - टोमॅटो व 2 हिरव्या मिरच्या कापून घ्यावेत. त्यानंतर त्यात 1 वाटी - दही , 1 चमचा - लाल तिखट , 1 चमचा - गरम मसाला , चवीनुसार - मीठ व 1 चमचा - आले लसूण पेस्ट घालून मिश्रण ढवळून 20 ते 25 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यावेत .
2 वाटी - तांदूळ ( Basmati Rice ) घ्यावेत व त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यावेत. मध्यम आचेवर 5 ते 6 वाटी पाणी गरम करून घ्यावेत व त्यात 1 - तमालपत्र ( तेजपत्ता ) , 1 इंच - दालचिनीची साल , 5 ते 6 - लवंग , 1 वेलची , 1 ते 2 चमचे - जिरे , पुदीनाची पाने , 2 ते 3 - हिरव्या मिरच्या , चवीनुसार - मीठ घालून एक उकळी काढून घ्यावीत. मग त्यात 1 चमचे - आले लसूण पेस्ट , एका लिंबाचा रस व धुवून घेतलेले तांदूळ ( Basmati Rice ) घालून ढवळून घ्यावेत. तांदूळ ( Basmati Rice ) अर्धवट शिजल्यानंतर ते मंद आचेवर ठेवून द्यावेत.
एक भांडे मध्यम आचेवर ठेवून त्यात 3 ते 4 चमचे - तूप , 2 चमचे तेल घालावेत व तेल गरम झाल्यावर त्यात 1 - तमालपत्र ( तेजपत्ता ) , 1 इंच - दालचिनीची साल , 5 ते 6 - लवंग , 1 वेलची , 1 ते 2 चमचे - जिरे ,अर्धा वाटी - कांदा , पुदीनाची पाने घालून मिश्रण ढवळून घ्यावेत व त्यात तयार केलेले पनीरचे मिश्रण घालावेत व ढवळून घ्यावेत. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यावेत.
शिजवून घेतलेल्या भातामधून पाणी काढून घ्यावेत व तो भात पनीरच्या मिश्रणात घालून घ्यावा . त्यानंतर त्यात 2 ते 3 चमचाभर तेल , कोथिंबीर कींवा पुदिना , अर्धा वाटी - तळलेला कांदा घालून त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घ्यावेत. त्यानंतर बिरयानी ढवळून ताटामध्ये काढून घ्यावी.
मग पनीर बिरयानी खाण्यासाठी तयार ...
VIDEO
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .