मोसंबीचा आरोग्यदायक सरबत ( mosambi healthy juice ) recipe in marathi

 

मोसंबीचा आरोग्यदायक सरबत ( mosambi healthy juice ) recipe in marathi

मोसंबीमध्ये व्हिटॅमिन 'ए', व्हिटॅमिन 'बी' आणि व्हिटॅमिन 'सी' ची मात्रा भरपूर असते. या फळाच्या सेवनामुळे पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते.लिंबूवर्गीय फळांच्या सेवनामुळे आपल्या आरोग्यासह त्वचेलाही भरपूर लाभ मिळतात.


सामग्री :
1 -   मोसंबी
2 चमचे  -  तेल
1 ते 2 चमचे  -  मोहरी
1 ते 2 चमचे  -  जिरे
1 चमचा -  हिंग
2 - हिरव्या मिरच्या ( बारीक चिरून )
1 चमचा -  लसूण ( बारीक चिरून )
आवश्यकतेनुसार मीठ
500 मिली पाणी

कृती :
 एका बाउलमध्ये मोसंबी पिळून त्याचा रस काढा. त्यामध्ये मीठ आणि पाणी मिक्स करावे. हे पाणी चमच्याच्या मदतीने ढवळावे.

आता एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या आणि चिरलेले लसूण परतून  घ्या. 30 सेकंद सर्व सामग्री ढवळत राहावी.

यानंतर ही फोडणी मोसंबीच्या रसामध्ये वरून सोडावी. तयार आहे मोसंबीचा रस. हा रस तुम्ही फ्रीजमध्ये थंड करूनही पिऊ शकता. मोसंबीच्या रसामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
सजावटीसाठी पुदीन्याची पाने वापरू शकता .

Post a Comment

0 Comments