आंबा व लिंबाचा सरबत ( mango lemon juice) recipe in marathi

 

आंबा व लिंबाचा सरबत ( mango lemon juice) recipe in marathi

साहित्य  :

लिंबू  -  10 ते 12

साखर  - 1 वाटी

आंबा  - 1

काळी मिरपूड  - 1 चमचा

बर्फ  - 4 ते 5 तुकडे


कृती :

सर्व लिंब कापून घ्या व एका भांड्यात त्यांचा सर काढून घ्या . एका कढईत एक वाटी पाणी गरम करायला ठेवा . पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी साखर टाकुन घ्या . व थोडे-थोडे ढवळून साखर वितळवून घ्या . साखर वितळल्यानंतर ज्योत बंद करून मिश्रण थंड होऊ द्या . मग त्यात लिंबांचा रस घालून मिश्रण ढवळून घ्या . हे मिश्रण फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस चांगले राहील .

एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा आंबा व आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्यावेत . एका ग्लासमध्ये  एक मोठा चमचा लिंबू व साखरेचे मिश्रण एक चमचा मिरपूड , तयार केलेले आंब्याचे मिश्रण व बर्फ घालून ढवळून घ्या .

आंबा व लिंबाचा सरबत पिण्यासाठी तयार... 


Post a Comment

0 Comments