ढोकळा ( Khaman Dhokla ) recipe in marathi

ढोकळा ( Khaman Dhokla ) recipe in marathi

साहित्य  :

बेसन -   2 वाटी

साखर  -  3 चमचे

रवा  -  2 चमचे

बेकिंग सोडा -  1 चमचा

बेकिंग पावडर  -  1  चमचा

लिंबाचा रस  -  3 चमचे

मीठ - 1  चमचा

हळद  -  1 चमचा

कडीपत्ता  -  4  ते  5 पाने

हिरवी मिरची  -  4  ते  5

मोहरी  -  2 चमचे

कोथिंबीर  - 4  ते  5 पाकळ्या

तेल -  आवश्यकतेनुसार 

पाणी  -  गरजेनुसार 


कृती :

एका वाडग्यात बेसन घ्यावेत व त्यात मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, रवा, साखर 2 चमचे आणि हळद घालून मिश्रण एकत्रित करून घ्यावेत. 

दुसर्‍या वाडग्यात एक कप पाणी घ्यावेत व त्यात लिंबाचा रस  -  2 चमचे , तेल - 2 चमचाभर व  त्यात तयार केलेले बेसनाचे मिश्रण घालून ढवळून घ्यावेत. ढवळताना मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

एका भांड्यात पाणी गरम करून घ्यावेत व त्यात एक लहान भांड किंवा वाटी ठेवा . भांडे पाण्यात बुडणार नाही याची काळजी घ्यावी .आता त्या वाटीवरती बेसनच्या मिश्रणाचे भांडे ठेवून द्या. व मध्यम आचेवर  20 मिनिटांसाठी शिजवून घ्यावेत. 

तडक्यासाठी एक भांडे मध्यम आचेवर ठेवून त्यात 2 चमचे तेल घालून त्यात मोहरी  -  2 चमचे, कडीपत्ता  -  4  ते  5 पाने, हिरवी मिरची  -  4  ते  5, पाणी 1 वाटीभर  , साखर 1 चमचा , लिंबाचा रस  -  1 चमचा , कोथिंबीर 3 ते 4 चमचे हे सर्व साहित्य घालून मिश्रण ढवळून घ्यावेत व 10 मिनिटांसाठी उकळवून घ्यावेत. 

बेसनचे मिश्रण एका ताटात काढून घ्यावेत व त्यावर हा तयार केलेला  तडका घालून घ्यावा . मग ढोकळा कापून खाण्यासाठी तयार...

VIDEO



Post a Comment

0 Comments