साहित्य :
लिंबू - 10 ते 12
साखर - 1 वाटी
पुदीना - 10 ते 15 पाने
आले - 1
सफेद मीठ - 1 चमचा
काळे मीठ - 2 चमचे
जिरेपूड - 1 चमचा
बर्फ - 4 ते 5 तुकडे
सोडा - 1 ग्लास
कृती :
सर्व लिंब कापून घ्या व एका भांड्यात त्यांचा सर काढून घ्या . एका कढईत एक वाटी पाणी गरम करायला ठेवा . पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी साखर टाकुन घ्या . व थोडे-थोडे ढवळून साखर वितळवून घ्या . साखर वितळल्यानंतर ज्योत बंद करून मिश्रण थंड होऊ द्या . मग त्यात लिंबांचा रस घालून मिश्रण ढवळून घ्या . हे मिश्रण फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस चांगले राहील .
अर्धे आले व पुदीना 10-15 पाने एकत्र करून बारीक वाटून घ्यावेत व त्यात एक चमचा सफेद मीठ, एक चमचा काळे मीठ घालून घ्यावेत .एका ग्लासमध्ये लिंबू व साखरेचे मिश्रण घालून त्यात एक चमचा आले व पुदीनाचे मिश्रण, एक चमचा काळे मीठ ,एक जिरेपूड, बर्फ व सोडा घालून ढवळून घ्या.
आले , पुदीना व लिंबाचे सरबत पिण्यासाठी तयार...
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .