शेवग्याच्या शेंगा व बटाट्याची भाजी ( Drumstick potato curry ) recipe in marathi

शेवग्याच्या शेंगा व बटाट्याची भाजी ( Drumstick potato curry ) recipe in marathi



साहित्य  :

बटाटे - 3  ते  4

शेवग्याच्या शेंगा - 3  ते  4

टोमॅटो - 2

मोहरी - 1 चमचा 

जिरे  - 1 चमचा

मेथी  - 1 चमचा

लाल तिखट  - 1 चमचा

जिरेपूड  - 1 चमचा

हळद  -  1 चमचा

मिरपूड  - 1 चमचा

धणेपूड  -  1 चमचा

लसूण पेस्ट  - 2 चमचे

लाल  सुकी मिरची - 1

मोहरीची पेस्ट  - 3 चमचे

कोथिंबीर  -  अर्धा वाटी

हींग  - 1 चमचा

मीठ  - चवीनुसार 

तेल  - आवश्यकतेनुसार 


कृती : 

3 ते 4 शेवग्याच्या शेंगांचे छोटे- छोटे तुकडे करून घ्यावेत. तसेच 3  ते  4 बटाटे व 2 -  टोमॅटो पण कापून  घ्यावेत.

एक कढई मध्यम आचेवर ठेवून त्यात 3 ते 4 चमचे तेल घालुन घ्यावेत . तेल गरम झाल्यावर त्यात शेवग्याच्या शेंगा व बटाटे अर्धवट तळून घ्यावेत. तळताना त्यात चवीनुसार मीठ घालावेत. व बटाटे , शेवग्याच्या शेंगा एका ताटात काढून घ्यावेत. मग त्या कढईत एक चमचाभर तेल घालून त्यात मोहरी - 1 चमचा  , जिरे  - 1 चमचा , मेथी  - 1 चमचा , लाल  सुकी मिरची - 1 , हींग  - 1 चमचा , लसूण पेस्ट  - 2 चमचे घालून मिश्रण ढवळून घ्यावेत. त्यानंतर त्यात मोहरीची पेस्ट  - 3 चमचे व पाणी घालून मिश्रण ढवळून घ्यावेत. 

2 मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यावेत व त्यात लाल तिखट  - 1 चमचा ,जिरेपूड  - 1 चमचा ,हळद  -  1 चमचा ,मिरपूड  - 1 चमचा ,धणेपूड  -  1 चमचा व आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यावेत.  व त्यात कापलेले टोमॅटो - 2 घालून थोडा वेळ शिजवून घ्यावेत . त्यानंतर त्यात शेंगा व बटाटे घालून मिश्रण ढवळून घ्यावेत व आवश्यकता भासल्यास त्यात मीठ चवीनुसार व पाणी घालून घ्यावेत .10 ते 15 मिनिटेे मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्यावी व त्यावर कोथिंबीर घालून भाजी ढवळून घ्यावी .

मग भाजी खाण्यासाठी तयार...



Post a Comment

0 Comments