साहित्य :
लिंबू - 10 ते 12
साखर - 1 वाटी
काकडी - अर्धी ( लहान कोवळी )
मीठ - 1 चमचा
लाल सुकी मिरची - 1 चमचा ( बारीक वाटून )
बर्फ - 4 ते 5 तुकडे
कृती :
सर्व लिंब कापून घ्या व एका भांड्यात त्यांचा सर काढून घ्या . एका कढईत एक वाटी पाणी गरम करायला ठेवा . पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी साखर टाकुन घ्या . व थोडे-थोडे ढवळून साखर वितळवून घ्या . साखर वितळल्यानंतर ज्योत बंद करून मिश्रण थंड होऊ द्या . मग त्यात लिंबांचा रस घालून मिश्रण ढवळून घ्या . हे मिश्रण फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस चांगले राहील .
अर्धी काकडी आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरला लावून बारीक वाटून घ्या . एका ग्लासमध्ये एक मोठा चमचाभर तयार केलेले लिंबू व साखरेचे मिश्रण घालून त्यात एक चमचा मीठ, एक चमचा लाल मिरची पावडर व बर्फ घालून ढवळून घ्या . मग त्यात काकडीचे मिश्रण घालून ढवळून घ्या .
काकडी , मिरची व लिंबाचा सरबत पिण्यासाठी तयार...
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .