साहित्य :
लिंबू - 10 ते 12
साखर - 1 वाटी
नारळाचे खोबरे ( कोवळे ) - 1 चमचाभर
नारळाचे पाणी - 1 ग्लास
बर्फ - 4 ते 5 तुकडे
कृती :
सर्व लिंब कापून घ्या व एका भांड्यात त्यांचा सर काढून घ्या . एका कढईत एक वाटी पाणी गरम करायला ठेवा . पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी साखर टाकुन घ्या . व थोडे-थोडे ढवळून साखर वितळवून घ्या . साखर वितळल्यानंतर ज्योत बंद करून मिश्रण थंड होऊ द्या . मग त्यात लिंबांचा रस घालून मिश्रण ढवळून घ्या . हे मिश्रण फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस चांगले राहील .
मिक्सरच्या भांड्यात एक चमचाभर नारळाचे खोबरे व पाणी घालून वाटुन घ्यावेत. एका ग्लासमध्ये एक मोठा चमचा लिंबू व साखरेचे मिश्रण घालून त्यात नारळाचे मिश्रण व बर्फ घालून ढवळून घ्या .
नारळाचे खोबरे व लिंबाचे सरबत पिण्यासाठी तयार...
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .