साहित्य :
चिकन - 1 किलो
तांदूळ ( Basmati Rice ) - 1 वाटी
तेल - आवश्यकतेनुसार
तूप - 4 ते 5 चमचे
तमालपत्र - 1
काळी मिरी - 1 चमचा
लवंग - 1 चमचा
वेलची - 1 चमचा
बटाटे - 2
दही - 4 ते 5 चमचे
आले लसूण पेस्ट - 2 चमचे
मीठ - चवीनुसार
हळद - 2 चमचे
लाल तिखट - 2 चमचे
तळलेला कांदा - 1 वाटी
टोमॅटो - 1
अंडी - 2
कोथिंबीर व पुदीना - सजावटीसाठी
कृती :
एका कढईत 2 चमचे तेल व 2 चमचे तूप घालून त्यात तमालपत्र, काळी मिरी, वेलची व लवंग प्रत्येकी अर्धा चमचाभर घालून घ्या .त्यानंतर त्यात कापलेले 2 बटाटे घालून 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घ्या .
एका वाडग्यात चिकन ,एक वाटी दही , 2 चमचे आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 2 चमचे हळद, 2 चमचे लाल तिखट, अर्धी वाटी तळलेला कांदा व 1 बारीक कापून टोमॅटो घालून मिश्रण ढवळून घ्या .त्यानंतर हे मिश्रण कढईत घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून शिकण्यासाठी ठेवून द्यावे .
दुसर्या कढईत 2 तूप व 2 चमचे तेल घालून त्यात तमालपत्र, काळी मिरी, वेलची व लवंग प्रत्येकी अर्धा चमचाभर घालून घ्या . मसाले भाजल्यावर त्यात पाणी घालून चवीनुसार मीठ घाला . एका वाडग्यात तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत व ते कढईत घालून शिजवून घ्यावेत. शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्यावेत व पहिल्या कढईत 2 अंडी घालून त्यासोबत तयार भात घालून घ्या .
10 मिनीटे शिजवल्यावर बिरयानी तयार..
सजावटीसाठी कोथिंबीर व पुदीना वापरावात .
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .