साहित्य :
चिकन - 500 ग्रॅम
आले पेस्ट - 2 चमचे
लसूण पेस्ट - 2 चमचे
लाल तिखट - 2 चमचे
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
कांदा - 1
लोणी - 1 वाटी
टोमॅटो - 3
काजू - 10 ते 15
पाणी - आवश्यकतेनुसार
व्हिनेगर ( malt vinegar )- 2 चमचे
गरम मसाला - 1 चमचा
क्रीम ( cream ) - 1 वाटी
कसुर मेथी - 2 चमचे
पिठीसाखर - 2 चमचे
कृती :
एका वाडग्यात चिकन घेऊन त्यात 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा आले पेस्ट , 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ घालून मिश्रण ढवळून घेऊन ते 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला एकजीव होण्यासाठी ठेवून द्या .
मग एका कढईत 5 ते 6 चमचे तेल घालून चिकन शिजवून घ्यावेत . व एका भांड्यात काढून घ्यावेत. मग एक कांदा कापून घ्या . आणि कढईत 2 ते 3 चमचे तेल घालून कांदा भाजून घ्या. व त्यात 2 ते 3 चमचे लोणी , 3 कापलेले टोमॅटो , काजू घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्या. मग त्यात 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा व्हिनेगर ( malt vinegar ), 1 चमचा पिठीसखर, व गरम मसाला घालून मिश्रण ढवळून घ्यावेत. ते 15 ते 20 मिनिटासाठी शिजवून घ्यावेत. त्यानंतर मिश्रण थंड होऊ द्यावे. व मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावेत. मग ते मिश्रण चाळणीच्या साहाय्याने कढईत घालून घ्या. त्यात 3 ते 4 चमचे लोणी , 2 चमचे कसुरी मेथी , क्रीम ( cream ) व तयार केलेले चिकन घालून शिजवून घ्यावेत.
बटर चिकन ( Butter chicken ) / चिकन मखनी ( chicken makhani ) खाण्यासाठी तयार....
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .