केळ्याचे कटलेट ( banana cutlet ) tikki recipe in marathi

 

केळ्याचे कटलेट  ( banana cutlet ) tikki recipe in marathi

साहित्य :

4 -  कच्ची केळी
1 -  इंच आलं किसून
1 ते 2 - चमचा वाटलेली हिरवी मिरची
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
1 चमचा धनेजीरे पूड
1 ते 2 चमचा चाट मसाला
1 ते 2 चमचा गरम मसाला
15 - 20  बेदाणे
1 वाटी ब्रेड क्रम्ब्ज
चवीपुरते मीठ

कृती :
प्रत्येक केळ्याचे 2  तुकडे करावेत. सालासकट कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यावेत. केळी शिजली की साल काढून आतला गर किसून घ्यावा.
किसलेल्या केळ्यात आलं, मिरची, कोथिंबीर, धनेजीरेपूड, चाट मसाला, गरम मसाला, 1 वाटी ब्रेड क्रम्ब्ज आणि मीठ घालून मळून घ्यावे.
छोट्या लिंबाएवढे गोळे करावेत. आतमध्ये 1 ते 2 बेदाणे घालून कटलेट तयार करावेत. कटलेटना थोडासा पाण्याचा हात लावून ब्रेड क्रम्ब्जमध्ये घोळवावेत.
गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
हिरवी चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.

Post a Comment

0 Comments