साहित्य :
3 ते 4 - उकडलेले बटाटे
अर्धा वाटी - कांदा
अर्धा वाटी - कोथिंबीर
4 ते 5 - पुदिनाची पाने
1 चमचा - लाल तिखट
1 चमचा - चाट मसाला
1 चमचा - धणेपूड
1 चमचा - हळद
1 चमचा - गरम मसाला
चवीनुसार - मीठ
1 चमचा - जिरेपूड
1 चमचा - ओवा
1 वाटी - गव्हाचे पीठ
1 वाटी - मैदा
आवश्यकतेनुसार - तेल किंवा तूप
कृती :
पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात 3 ते 4 - उकडलेले बटाटे किसून घ्यावेत व त्यात अर्धा वाटी - कांदा , अर्धा वाटी - कोथिंबीर , 4 ते 5 - पुदिनाची पाने ,1 चमचा - लाल तिखट , 1 चमचा - चाट मसाला ,1 चमचा - धणेपूड, 1 चमचा - हळद ,1 चमचा - गरम मसाला, चवीनुसार - मीठ ,1 चमचा - जिरेपूड व 1 चमचा - ओवा घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावेत.
बटाट्याचे मिश्रण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यावेत . व दुसर्या वाडग्यात 1 वाटी - गव्हाचे पीठ , 1 वाटी - मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ व 3 ते 4 चमचे तेल घालून पीठ चांगले मळून घ्यावेत. तसेच त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ पुन्हा मळून घ्यावेत. व त्यावर झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटांपर्यंत ते पीठ झाकून ठेवून द्यावेत.
मग पीठाचे लहान लहान गोळे तयार करून घ्यावेत. व त्या पीठाच्या गोळ्याची पोळी लाटून घ्यावीत. पोळी लाटताना गव्हाचे पीठ पोळीला लावुन घ्यावेत त्यामुळे पोळी चिकटत नाही . मग बटाट्याच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून त्या लाटून घेतलेल्या पोळीत ठेवून पोळी चार बाजूंनी एकत्रित करून घ्यावीत . बटाट्याचे मिश्रण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी . व पोळी लाटून घ्यावीत
मग तवा मध्यम आचेवर ठेवून त्यावर तेल घालून त्यावर पोळी भाजून घ्यावीत . पोळी लालसर होईपर्यंत परतून घ्यावीत व त्यावर तेल किंवा तूप घालून घ्यावेत.
मग पराठे ताटात काढून घ्यावेत. बटाटा पराठे , आलू के पराठे खाण्यासाठी तयार...
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .