साहित्य :
तांदूळ - 1 वाटी
उडदाची डाळ - अर्धी वाटी
चना डाळ - अर्धी वाटी
तुरडाळ - अर्धी वाटी
मुग डाळ - अर्धी वाटी
सुकी लाल मिरची - 7 - 8
कडीपत्ता - 10 - 12 पाकळ्या
हिंग - 1 चमचा
जिरा - 1 चमचा
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
कृती :
एका भांड्यात तांदूळ आणि उडीद डाळ ,चना डाळ ,तुरडाळ ,मुग डाळ घालून घ्या. त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर सुकी लाल मिरची, कढीपत्ता, जिरे आणि हिंग घाला. 2 कप पाणी घालून कमीत कमी 2 तास भिजवावे. नंतर ते भिजले गेल्यावर मिक्सरला बारीक लावून घ्या. मग ते मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. व त्यात मीठ घालून चांगले मिक्स करावे.एक तवा गरम करायला ठेवा . तवा गरम झाल्यावर त्यावर तेल लावून घ्या . मग तव्यावर मिश्रण घाला व पसरवून घ्या. मध्यम आचेवर शिजू द्यावे, एकदा वरच्या बाजूने थोडेसे तेल सोडून घ्या आणि कडा तपकिरी होईपर्यंत शिजवा. शिजल्यानंतर चमच्याने काढून घ्या व ताटात चटणी बरोबर सजावट करा
अडई डोसा खाण्यासाठी तयार..
0 Comments
हा चविष्ट पदार्थ तुम्हाला कसा वाटला ?
तसेच काही नवीन टिप असेल तर नक्कीच कळवा .